..म्हणून मी मुंबईतील तुरुंगामध्ये कैद्यांसमोर नाचले; रिया चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा

रिया चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती नकतीच 'डिप टॉक विथ चेतन भगत' या कार्यक्रामध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रामुळे रिया चर्चेत आली आहे.

अनेक गोष्टींबद्दल केला खुलासा

रियाने या कार्यक्रामध्ये तुरुंगातील तिचं आयुष्य कसं होतं याबद्दल भाष्य केलं आहे. तिने तिच्या दिनक्रमापासून तुरुंगातील कैद्यांसाठी केलेल्या डान्सपर्यंत अनेक गोष्टींचा पहिल्यांदाच खुलासा केला.

रियाला अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रियाला अटक करण्यात आली होती.

रियाला का करण्यात आली अटक

सुशांतने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली तेव्हा रिया त्याला डेट करत होती. या प्रकरणात तिला हात होता असा संशय होता म्हणून तिला अटक करण्यात आलेली.

कोणत्या तुरुंगात होती रिया?

रियाला मुंबईतील भायखळा तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं.

पहाटे 4 वाजता सुरु व्हायचा दिवस

रियाने दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगामध्ये तिचा दिवस पहाटे 4 वाजता सुरु व्हायचा. पहाटे 6 ला ती नाश्ता करायची.

दुपारी 2 ला करायची रात्रीचं जेवण

रिया तुरुंगात असताना दुपारचं जेवण 11 वाजता करायची तर रात्रीचं जेवण दुपारी 2 वाजताच करायची.

रियाला मिळायचे पैसे

तुरुंगामध्ये प्रत्येक कैद्याला महिन्याला 5 हजार रुपये त्याच्या नातेवाईंकांकडून अथवा मित्रांकडून घेण्याची परवानगी असायची. असेच पैसे रियाला मिळायचे.

अर्ध्याहून अधिक पैसे यासाठी करायची खर्च

रिया तिला मिळणाऱ्या 5 हजारांपैकी अर्ध्याहून अधिक पैसे पिण्याच्या पाण्यासाठी वापरायची.

तुरुंगात खायला काय असायचं?

रियाने दिलेल्या माहितीनुसार तुरुंगामध्ये केवळ रोटी आणि बटाटा-शिमला मिर्चीची भाजी मिळायची. खरं तर ती पाण्यात उकळलेली शिमला मिर्ची असायची, असं रिया म्हणाली.

कैंद्यांना दिलेला शब्द

रियाने या कार्यक्रमात दिलेल्या माहितीनुसार, तिने तिच्या तुरुंगातील सहकारी कैद्यांना एक आश्वासन दिलं होतं.

...तेव्हा डान्स करुन दाखवेन

ज्या दिवशी मला जामीन मिळेल त्या दिवशी मी तुम्हाला नाचून दाखवेन, असं रिया तिच्या सहकारी कैद्यांना म्हणालेली.

शब्द दिल्याप्रमाणे नाचली

रियाला जामीन मिळाल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ती 'नागिण गीन गीन' गाण्यावर तुरुंगातील सहकारी कैद्यांसमोर नाचली होती.

VIEW ALL

Read Next Story