महिन्यांच्या बाळाला सोडून परदेशात फिरतेय ही अभिनेत्री

दृश्यममध्ये लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री इशिता दत्ता सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

इशिता दत्ता सध्या विदेशात असून चिमुकल्या लेकाला घरी एकटं सोडून का फिरतेय, हे तिने स्पष्ट केलं आहे.

इशिताने एक पोस्ट शेअर करत मॉम गिल्टबाबत म्हटलं आहे. इशिता पहिल्यांदा लंडनला गेली आहे. तिथले काही फोटोही तिने शेअर केले आहेत.

इशिताने म्हटलं आहे की, गरोदरपणानंतरची माझी पहिली ट्रिप त्याचबरोबर वायुशिवायदेखील माझी पहिली लंडन ट्रिप

मी लंडनमध्ये खूप हसले, रडले, डान्स केला, शॉपिंग केला आता फायनली मला पूर्वीची मी सापडली आहे. मला खूप जास्त मॉम गिल्ट आलं पण मला मजाही तितकीच आली.

इशिताच्या या पोस्टवर एकाने कमेंट करत, मुलाला दूध कोण पाजणार असा प्रश्न विचारला, त्यावर तिने मी दूध स्टोअर केलं असून कधी तरी फॉर्मुला मिल्क वापरले जाते.

इशिताच्या या पोस्टवर तिचे फॅन्स कमेंट करत तिला सपोर्ट करत आहे. युजर्सने म्हटलं आहे की, तु स्वतःसाठी वेळ काढते हे खूप चांगलं आहे.

VIEW ALL

Read Next Story