मोबाईल हा प्रत्येकासाठी अत्यावश्यक बनला आहे. यासाठी अनेकजण चांगल्या मोबाईलच्या शोधात असतात.

विशेषता चांगला स्पीड, चांगला कॅमेरा असलेला पण 10 हजार रुपयांच्या आत किंमत असलेला फोन घ्यायचा असतो.

Samsung Galaxy F13 हा स्मार्टफोन Samsung च्या अधिकृत वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 8199 रुपये आहे. 50MP चा रिअर कॅमेरा या फोनला आहे.

याशिवाय 50MP चा प्रायमरी कॅमरा आहे. 6000mAh ची बॅटरी असून 6.6 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. 8GB रॅमसहित हा फोन येतो.

Redmi 12 Croma स्टोरवर 9,299 रुपयात लिस्टेड आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 4GB Ram, 128GB चं इंटरनल स्टोरेज आहे.

Nokia C32 हा फोन भारतात मे 2023 मध्ये लाँच करण्यात आला. Amazon वर या फोनची किंमत 8499 रुपये इतकी आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. 50MP कॅमेरा हे या फोनंच वैशिष्ट्य आहे

Realme C53 या फोनमध्ये तब्बल 108MP कॅमेरा देण्यात आला आहे. आणि या फोनची किंमत अवघी 9790 रुपये इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story