अप्सरा आली... जिनिलिया देशमुखचा पारंपरिक लूक

सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया आणि रितेश देशमुख यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंबाने एकत्र बाप्पाचे स्वागत केले.

जिनिलियाने गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक लूक केला होता. यात तिने पैठणीचा घागरा परिधान केला होता.

पैठणी घागरा, ब्लाउजवरील सुंदर नक्षीकाम, केसात माळलेला गजरा यात जिनिलिया खूपच मोहक आणि सुंदर दिसत होती.

जिनिलिया आणि रितेश या दोघांनी पारंपरिक अंदाजात रोमॅंटिक फोटो सुद्धा शेअर केला.

जिनिलिया आणि रितेशचे फॅन्स त्यांच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

जिनिलियाने 2023 रोजी सिरीज झालेल्या 'वेड' या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशने केले होते.

जिनिलियाने लग्नानंतर अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी तिने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं असून ती सध्या अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

VIEW ALL

Read Next Story