लालबागचा राजाची ख्याती मुंबईसह देशविदेशातही आहे.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळदेखील प्रसिद्ध आहे.
1934 पासून येथे गणेश मुर्ती स्थापनेला सुरुवात झाली.
कांबळी परिवार लालबागचा राजाची मुर्ती घडवतो.
नवसाला पावणारा राजा अशी या गणपतीची ख्याती आहे.
त्यामुळे लाखो भाविक नवस फेडण्यासाठी, करण्यासाठी येतात. आणि दररोज लाखो रुपये राजाच्या दानपेटीत टाकले जातात.
लालबागचा राजाला भाविकांनी पहिल्या दिवशी भाविकांनी 48.30 लाखाचे दान दिले.
दुसऱ्या दिवशी 67 लाख 10 हजाराची रोख रक्कम जमा झाली.
पहिल्या दिवशी 255.80 ग्रॅम सोनं आणि 5,024 ग्रॅम चांदीचे दान देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी 342.770 ग्रॅम सोनं आणि चांदी दान करण्यात आली.