आमिरच्या मुलीच्या लग्नाची तारीख ठरली

पहिल्या Kiss शी आहे संबंध

Aug 09,2023


आमिर खानची लाडकी लेक आयरा खान हिचं गेल्या वर्षी साखरपुडा झाला आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे.


आयराने एका वेबसाइडला दिलेल्या मुलाखतीत लग्नाची तारीख सांगितली आहे. या तारखेचं रोमँटिक कनेक्शन आहे.


आयरा आणि नुपूरने लग्न करण्यासाठी 3 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. पण यात एक ट्वीस्ट आहे. कुठल्या वर्षी लग्न करणार हे मात्र तिने सांगितलं नाही.


यावर आयरा म्हणाली की, आम्हाला माहिती आहे 3 जानेवारी लग्न करणार आहोत. पण कुठल्या वर्षी ते अजून ठरवलं नाही.


या तारखेबद्दल एक रोमँटिक क्षणाची आठवण जोडली असल्याचं आयरा म्हणाली आहे.


ती म्हणाली की, 3 जानेवारीला हा दिवस आमच्यासाठी खास आहे. कारण यादिवशी आम्ही एकमेकांना पहिल्यांदाच Kiss केलं होतं.


आयरा आणि नुपूरमधील केमिस्टीची झलक कायम दिसून येते. दोघेही इंस्टावर अनेक रोमँटिक क्षणाचे फोटो पोस्ट करत असतात.


जेव्हा आयरा नैराश्याने ग्रासली होती तेव्हा नुपूरच्या येण्यामुळे तिचं आयुष्य सकारात्मक गोष्टींची बहरुन गेलं.


नुपूर हा फिटनेस ट्रेनर असून त्याने आमिरसह अनेक सेलिब्रिटींना ट्रेंनिग दिलं आहे. शिवाय तो आयराचाही फिटनेस ट्रेनरदेखील आहे.

VIEW ALL

Read Next Story