इंग्लंडचा जेम्स अँडरसन खेळाडूने वयाच्या 41 वर्षी क्रिकेट विश्वात मोठा इतिहास रचला. 47 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या विश्वात कसोटी सामन्यात 700 विकेट्स घेणारा जेम्स अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला.
2003 मध्ये जेम्स अँडरसनने कसोटी सामन्याला सुरूवात केली. मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्नर या वेगवान गोलंदाजांच्या यादीत आता, जेम्सचा समावेश झाला आहे.
इंडिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवची विकेट काढत जेम्स अँडरसनने करियरचा मोठा टप्पा गाठला.
धर्मशाळाच्या स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पाचव्या कसोटी सामन्याआधी जेम्स अँडरसनने 698 विकेट्स विक्रम रचला होता.
अंतिम कसोटी सामन्यात 259 धावांची आघाडी घेत टीम इंडियाने इंग्लंडवर 4-1 असा विजय मिळवला.
खरं तर भारताने चार ,सामन्यातच केलेल्या कामगिरीने आधीच ही मालिका जिंकली होती. मात्र जेम्स अँडरसनच्या या खेळीमुळे एक कसोटी मालिका विश्वात नवा इतिहास रचला गेला.