ICC ने जाहीर केला 2022 सर्वोत्कृष्ट वनडे संघ, ना कोहली, ना रोहित 2 भारतीयांचा समावेश!

ICC Mens ODI Team 2022 :  ICC ने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 चा सर्वोत्कृष्ट ODI संघ जाहीर केला आहे. या संघात 2 भारतीय खेळाडूंचा समावेश असून यामध्ये श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे आहेत. तर पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमकडे कर्णधारपद दिलं आहे. भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना स्थान मिळवता आलं नाही. (ICC Mens ODI Team of the Year 2022 latest marathi Sport News) 

ऑस्ट्रेलियाचे ट्रॅव्हिस हेड आणि अॅडम झम्पा, वेस्ट इंडिजचे शाई होप आणि अल्जारी जोसेफ आणि न्यूझीलंडच्या टॉम लेथम आणि ट्रेंड बोल्ट या दोन खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधारपद देण्यात आलेल्या बाबर आझमचे एकट्याचं पाकिस्तान संघातील नाव आहे.

2022 मध्ये बाबरने 9 एकदिवसीय सामन्यात 84.87 च्या सरासरीने 679 धावा केल्या आहेत. भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. 17 सामन्यांमध्ये अय्यरने 55 च्या सरासरीने 724 धावा   केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. 

 

ICC पुरुष एकदिवसीय संघ 2022 :  बाबर आझम (कप्तान)पाकिस्तान, ट्रैविस हेड- ऑस्ट्रेलिया, शाई होप- वेस्ट इंडिज, श्रेयस अय्यर- भारत, टॉम लाथम (विकेटकीपर)- न्यूझीलंड, सिकंदर रजा- झिम्बाब्वे, मेहदी हसन मिराज-बांग्लादेश, अल्जारी जोसेफ- वेस्ट इंडिज, मोहम्मद सिराज- भारत, ट्रेंट बोल्ट- न्यूजीलैंड, एडम झम्पा- ऑस्ट्रेलिया

दरम्यान, आयसीसीने सोमवारी टी-20 संघ जाहीर केला होता. या संघात 3 भारतीय खेळाडूंचा समावेश असून यामध्ये विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि सुर्यकुमार यादव या तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहलीने याआधी आयसीसीच्या वनडे आणि कसोटी संघामध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र टी-20 संघात त्याचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
ICC Mens ODI Team of the Year 2022 latest marathi Sport News
News Source: 
Home Title: 

ICC ने जाहीर केला 2022 सर्वोत्कृष्ट वनडे संघ, ना कोहली, ना रोहित 2 भारतीयांचा समावेश!

 

ICC ने जाहीर केला 2022 सर्वोत्कृष्ट वनडे संघ, ना कोहली, ना रोहित 2 भारतीयांचा समावेश!
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
ICC ने जाहीर केला 2022 सर्वोत्कृष्ट वनडे संघ, ना कोहली, ना रोहित 2 भारतीयांचा समावेश
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, January 24, 2023 - 13:48
Request Count: 
1
Is Breaking News: 
No