तुमचा चेहरा हेच तुमचं क्रेडिट कार्ड!
www.24taas.com, झी मीडिया, लंडन
ब्रिटनचे नागरिक लवकरच आपल्या चेह-याचा वापर करुन खरेदी करु शकतील अर्थात खरेदी साठी त्यांना पैसे किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज लागणार नाही.
पेपाल एक असं तंत्र विकसीत करणार आहे, की ज्यामुळे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी कोणतंही माध्यम लागणार नाही तर त्यांच्या चेहरा त्यांच्या अकांऊटशी जोडलेला असेल आणि दुकानदार त्याचाच वापर करुन ग्राहकांच्या अकांऊंटमधून खरेदीची रक्कम घेऊ शकतो.
अँड्रॉईड टेक्नोलॉजी असलेल्या फोनमध्ये यासंबंधी अप तयार करण्यात आलं आहे. पेमेंटसाठी मोबाईलवर पिन नंबर स्लाईड करताच दुकानदाराच्या मोबाईलवर ग्राहकाच्या चेहऱ्याचा फोटो दिसेल. ग्राहकाने खरेदीसाठी होकार दिल्यावर दुकानदार ग्राहकाच्या फोवर क्लिक करून पेमेंट मिळवू शकेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
तुमचा चेहरा हेच तुमचं क्रेडिट कार्ड!