मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर!

पुणे : Shiv Sena's offer to Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नाराज वसंत मोरे (Vasant More) यांना शिवसेनेची (Shiv Sena) ऑफर दिली आहे. वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहर प्रमुख पदावरुन दूर केले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी आपण कायमच मनसेसोबत राहणार असल्याचे कालच म्हटले होते. मात्र, आता युवा शिवसेना नेते वरुन देसाई यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधत शिवसेनेत येण्याची ऑफर दिला आहे. शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडून त्यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, नाराज वसंत मोरे हे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. मात्र, कालच त्यांनी स्पष्टीकरण देत आपण राज ठाकरे यांच्यासोबत सुरुवातीपासून होतो आणि यापुढेही राहू, असे स्पष्ट केले होते. मात्र, आता त्यांना सेनेकडून विचारणा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ही विचारणा झाली आहे. वसंत मोरे सेनेच्या वाटेवर, असल्याची चर्चा आहे. मात्र, वसंत मोरे यांच्याकडून कोणाला अजून काही ऊत्तर आलेले नाही. मोरे काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी लाऊडस्पीकर न काढल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याच्या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष पुढे आला आहे. पक्षाच्या विरोधात वसंत मोरे यांनी भूमिका घेतली. थेट राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध केला. त्यानंतर त्यांची पुणे शहर अध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अन्य राजकीय पक्षांकडून विचारणा होत आहे. मात्र, शिवसेनेची थेट ऑफर असल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे.

वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या विधानाशी असहमती दर्शवताना म्हटले होते की, मी माझ्या प्रभागातील मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवणार नाही. अनेक मुस्लिम मला मतदान करतात.आपण राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज नसून पक्षप्रमुखांनी केलेल्या वक्तव्यानंतर काय भूमिका घ्यायची याबाबत संभ्रमात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ठाकरे यांच्या वक्तव्यावर मनसेचे पुणे शहर शाखाप्रमुख माजीद शेख आणि दुसरे नेते शैबाज पंजाबी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Shiv Sena's offer to MNS leader Vasant More
News Source: 
Home Title: 

मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर! 

मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर!
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना शिवसेनेची ऑफर, CMकडून विचारणा
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, April 8, 2022 - 09:50
Request Count: 
1
Is Breaking News: 
No