'मोपलवारांना मिळालेली क्लीन चिट संशयास्पद'
नागपूर : समृद्धी महामार्ग प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राधेश्याम मोपलवार यांना मिळालेली क्लीन चिट संशयास्पद असल्याचा आरोप 'सजग नागरिक मंचा'ने केलाय.
मोपलवार हे ज्येष्ठ सनदी अधिकारी असून समृद्धी महामार्गाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आरोप झाल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. आता पुन्हा त्यांच्याकडे समृद्धीची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
या पार्शवभूमीवर मोपालवारांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी सजग नागरिक मंचानं केलीय. माहिती अधिकार कायद्यानुसार ते बंधनकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रंही लिहिलंय.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
sajag nagrik manch on mopalvar clean chit
News Source:
Home Title:
'मोपलवारांना मिळालेली क्लीन चिट संशयास्पद'
Yes
No
Section:
Facebook Instant Article:
Yes