यामी गौतमीकडून हिना खानच्या इंस्टाग्रामवर कब्जा, सोडण्यासाठी ठेवली ही अट
मुंबई : हिना खान ही टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि अनेकदा लोकप्रिय ट्रेंड फॉलो करते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. हिनाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात सुरुवातीला हिना खान दिसते. आणि व्हिडिओ सुरु असतानाच अचानक अभिनेत्री यामी गौतम दिसून लागते. या व्हिडिओत यामी बोलताना दिसतेय की, हिना खानच्या इंस्टाग्राम अकांऊन्टवर मी कब्जा केला आहे. आणि ते जर तिला परत हवं असेल तर तिला तिच्या आयुष्यातला असा किस्सा ऐकवावा लगाणार आहे की, ज्यानंतर ती तिच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यानंतरच तिला तिचं अकांऊन्ट परत मिळेल.
काही वेळाने हिना खानने आणखी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिने यामी गौतमचा टास्क पूर्ण केला आहे. तिने तिच्या आयुष्यातील तो किस्सा सांगितला जेव्हा तिचं नियंत्रण सुटलं होतं. या व्हिडिओमध्ये तिने इंडस्ट्रीत 13 वर्षे पूर्ण केल्याचं सांगितलं. तिला खूप प्रसिद्धीही मिळाली. पण त्यामुळे तिची स्वतःची ओळख संपली. कारण लोकं तिला अक्षरा या नावानेच ओळखायचे.
हिना खान व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतेय की, 'मी टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अक्षराची भूमिका साकारली होती. अनेक तास काम करून मी माझी स्वप्नं साकार केली. पण सगळ्या यशानंतरही मी समाधानी नव्हते. माझी तब्येत ढासळत होती. पण अभिनय हाच माझा आनंद आणि आधार होता.
हिना खानने सोडला शो
हिना खान पुढे म्हणाली, ''जर मी हा शो सोडला तर माझं करिअर संपणार होतं पण मी ते केलं जे अकल्पनीय होतं. आणि मी शोसोबत माझा कम्फर्ट झोन सोडला. तेव्हा मी माझं कर्जही फेडत होते. पण मला हे करायचं होतं. नाहीतर आज मी जिथे आहे तिथे पोहोचले नसते. हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता आणि माझ्या आयुष्यात बदल घडवून आणणार होता.
यामी गौतमीकडून हिना खानच्या इंस्टाग्रामवर कब्जा, सोडण्यासाठी ठेवली ही अट