जर पॅन आणि आधार लिंक केले नाही तर पॅन निष्क्रीय होणार आहे. त्यामुळे अनेक अचडणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे आताच 1,000 रुपये दंड भरुन पॅन आणि आधार कार्ड लिंक करू शकता.
भारताच्या आयकर विभागाने प्रत्येक रहिवाशासाठी दोन्ही ओळखपत्रे लिंक करणे अनिवार्य केले आहे.
आता जर एखाद्याला आपला पॅन आणि आधार लिंक करायचा असेल तर त्याला 1000 रुपये दंड भरावा लागेल. NSDL पोर्टलवर पेमेंट करण्यासाठी चलन क्रमांक ITNS 280 वापरून हे पूर्ण केले जाऊ शकते.
पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढविण्यात आली आहे. ही मुदत 30 जून 2023 पर्यंत आहे.
पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनुसार, जर दोन्ही लिंक केले नाहीत तर त्यांचे पॅन कार्ड 'इनऑपरेटिव्ह' होऊ शकतात. परिणामी तुम्ही आर्थिक व्यवहार करु शकणार नाही.
पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे पॅनकार्ड असेल तर आता सरकार लावणार 1000 रुपये दंड, तुमची यातून सुटका होणार नाही.