AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने बनवण्यात आलेली चित्र ही केवळ कल्पना आहेत. भविष्यात मुंबई अशी दिसेलच असं नाही.
AI माध्यमातून बनवण्यात आलेली भविष्यातील मुंबईचं रुप अतिशय हायफाय आहे. यातील सर्वाधिक चित्र ही रात्रीच्यावेळची तयार करण्यात आली आहेत.
AI च्या माध्यमातून बनवलेलं प्रत्येक चित्र एकमेकांपासून वेगळ्या स्वरुपाचं असतं. याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबईचे फोटो तयार करण्यात आले आहेत.
या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण भविष्यातलं चित्र रेखाटू शकतो. यासाठी कल्पनाशक्ती आणि इंटरनेटची गरज आहे.
AI बॉट्स तंत्रज्ञान लोकांच्याही पसंतीस पडलं आहे. युजर्सच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर हे तंत्रज्ञान काम करतं.
2023 वर्षांच्या सुरुवातीपासून AI बॉट्स लोकप्रिय झालं आहे. सुरुवातीला ChatGPT चर्चेत होतं, पण या शर्यतीत आता AI पुढे निघून गेलंय.
भविष्यात आपली मुंबई कशी दिसेल? आज याचा आपण केवळ अंदाज लावू शकतो. पण AI ने लोकांनी व्यक्त केलेला अंदाज चित्रस्वरुपात मांडला आहे.