केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी, तसंच केसांना अधिक मजबूती मिळण्यासाठी आणि कोंड्यापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग करता येतो. तसंच केसांची निगा राखण्यासाठी आणि केसांचा विकास होण्यसाठीही आवळा पावडरचा उपयोग होतो.
आवळ्यामध्ये असणारे विटामिन सी हे डोळ्यांची दृष्टी चांगली राखण्यास मदत करते. तसंच आवळ्यात असणारे लोह आणि अनेक खनिजे ही डोळ्यांच्या अनेक समस्या दूर करण्यसाठीही फायदेशीर ठरतात. याचा उपयोग मोतीबिंदूच्या उपचारासाठीही करण्यात येतो.
रोज आवळ्याचे सेवन हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असून इम्यूनोमॉड्युलेटरी गुण अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढते आणि आपल्याला रोगांपासून दूर राहण्यास मदत मिळते.
आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुम्हाला हाडांचा अधिक चांगला विकास करता येतो आणि अन्य कोणत्याही गोष्टीची मदत घ्यावी लागत नाही. याचा तुम्ही नियमित वापर करून हाडे मजबूत करून घेऊ शकता.
एका शोधामध्ये सांगितल्यानुसार आवळ्याची पावडर हृदय निरोगी राखण्यास मदत करते. रक्तदाबासारख्या रोगांशी लढा देणे सोपे होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात धमन्यांच्या रोगाविरोधात सुरक्षा मिळते.
तसंच आवळ्यातील गुण हे कॅन्सरचा उपचार आणि कॅन्सर थांबविण्यासाठी बऱ्याच अंशी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही नियमित आपल्या आहारातही आवळा पावडरचा अथवा आवळ्याचा समावेश करून घ्यायला हवा.
रोज आवळ्याची पावडर सेवन केल्याने रक्तातील असलेला ग्लुकोजचा स्तर कमी करण्यासाठी उपयोग होईल. तसंच याने केवळ मधुमेह नियंत्रणातच नाही आणता येत तर याच्या सेवनाने मधुमेह थांबविण्यासाठीही याचा उपयोग होतो.
तुम्ही नियमित आवळा पावडरचा समावेश आपल्या आहारात करून घेतला तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी याची मदत मिळते.
आवळ्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया उत्तम होते. पचनक्रिया उत्तम झाली तर आपोआपच वजन कमी होण्यास सुरूवात होते. वास्तविक यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे त्रास कमी होतो.
आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रणात येण्यास मदत मिळते. तसंच अतिरिक्त चरबी आवळा शरीरामध्ये जमू देत नाही.
आवळा पावडरमध्ये कोणकोणती पोषक तत्व आहेत. तसेच संपूर्ण शरीराला आवळा पावडरचे वेगवेगळे फायदे होतात. त्याची माहिती जाणून घेऊया...