निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. त्यानंतर स्नान करुन भगवान विष्णूच्या 'ओम नमो वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप करताना तुळशी मातेची पूजा करुन तुळशीला अन्न अर्पण करावे. हा उपाय केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.
निर्जला एकादशी दिवशी केले व्रत फायदेशीर ठरते. तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असल्यास तुळशीमातेला लाल चुणरी अर्पण करा. लाल चुनरी हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लाल चुनरी तुळशी अर्पण केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा राहते.
निर्जला एकादशी दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळते. जर कोणाचे काम होत नसेल तर या दिवशी तुळशीसमोर दिवा लावून तुळशीमातेची आरती करावी. तसेच तुळशीभोवती प्रदक्षिणा करावी. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये.
निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसाठी जे काही चरणामृत आणि पंजिरीचा भोग तयार केला जातो. या भोगात तुळशीची पाने अवश्य टाकावीत. त्यानंतरच भगवान विष्णूला अन्न अर्पण करा. हा उपाय केल्याने व्यक्तीला धनाची कमतरता भासत नाही आणि विष्णूची कृपा राहते.
Nirjala Ekadashi 2023 Upay : हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. निर्जला एकादशी ही त्यापैकीच एक. इतर सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूची कृपा कायम राहते. तसेच या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने व्यक्तीला धन, आरोग्य आणि कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.