यादीत दहावं स्थान आहे कॅनडाच्या Thomson Reuters ची मालकी असणाऱ्या Thomson कुटुंबाचं. त्यांची एकूण संपत्ती आहे 71.1 अब्ज डॉलर्स.
शनेलची मालकी असणारं Wertheimer कुटुंब यादीत 89.6 अब्ज डॉलर्ससह नवव्या स्थानावर आहे.
89.9 अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह भारतातील रिलायन्स उद्योग समुहाची मालकी असणारं अंबानी कुटुंब या यादीत आठव्या स्थानावर आहे.
सौदी अरेबियाची सत्ता हाताळणारं अल सौद कुटुंब या यादीत सातव्या स्थानी आहे. त्यांची एकूण संपत्ती आहे 112 अब्ज डॉलर्स.
अमेरिकेच्या कोच इंडस्ट्रीज या कंपनीची मालकी असणाऱ्या कोच कुटुंबाला या यादीत सहावं स्थान मिळालं आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा आहे 127.3 अब्ज डॉलर्स.
पाचव्या स्थानावर आहे कतारमधील सत्तेवर असणारं अल थानी कुटुंब. या कुटुंबाची एकूण संपत्ती आहे. 133 अब्ज डॉलर्स.
अमेरिकेतील मार्स कंपनीची मालकी असणारं मार्स कुटुंब या यादीत चौथ्या स्थानावर असून, त्यांची एकूण संपत्ती आहे 141.9 अब्ज डॉलर्स.
यादीत तिसरं स्थान आहे फ्रान्सच्या हर्मीसची मालकी असणाऱ्या हर्मीस कुटुंबाचं. त्यांची एकूण संपत्ती आहे 150.9 अब्ज डॉलर्स.
यादीत दुसऱ्या स्थानी आहे अमेरिकेतील वॉलमार्टची मालकी असणारं वॉल्टन कुटुंब. त्यांच्या संपत्तीचा आकडा आहे 259.7 अब्ज डॉलर्स.
पहिल्या स्थानावर आहे संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) मधील सत्ता असणारं अल नाह्यान कुटुंब. त्यांची संपत्ती आहे 305 अब्ज डॉलर्स.