ही बातमी तुमच्यासाठी

Demat Account असणाऱ्यांसाठी यंदाच्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर ही तारीख अतिशय खास असणार आहे. सिक्योरिटीज एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून गुंतवणुकदारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हाती घेत डिमॅट अकाऊंट आणि म्यूचुअल फंड अकाउंटधारकांचे असेट सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जात आहे.

Dec 11,2023

रक्कम पूर्णपणे मिळावी यासाठी...

कोणत्याही दुर्दैवी घटनेनंतर कोणताच वाद डोकं वर न काढता नॉमिनीला संबंधित व्यक्तीच्या नावे असणारी रक्कम पूर्णपणे मिळावी यासाठी नॉमिनीची सविस्तर माहिती दिली जाणं अतिशय महत्त्वाचं आहे.

नॉमिनीची माहिती

थोडक्यात आता डिमॅट खातेधारकांनी त्यांनी निवडलेल्या नॉमिनीची संपूर्ण माहिती देणं अपेक्षित असून, त्यासाठीची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर. या तारखेनंतरही नॉमिनीची माहिती न दिल्यास खातेधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नातेवाईकांची सविस्तर माहिती

डिमॅट खातं असणारी मंडळी आई- वडील, भाऊ बहीण, मुलं किंवा इतर कोणा व्यक्तीला नॉमिनी ठेवू शकतात. यामध्ये एका अल्पवयीन सदस्याचं नावही नॉमिनी म्हणून ठेवता येऊ शकतं. पण, त्याच्या नातेवाईकांची सविस्तर माहिती मात्र इथं द्यावी लागेल.

ऑनलाईन पद्धत

ऑनलाईन पद्धतीनं नॉमिनीची माहिती देण्यासाठी सर्वप्रथम डिमॅट अकाऊंटमध्ये लॉगईन करून त्यामध्ये ‘Profile segment’ निवडा आणि ‘My nominees’ वर क्लिक करा.

आयडी प्रूफ

आता ‘Add nominee’ किंवा ‘Opt-out’ पर्याय निवडा. सविस्तर माहिती भरून नॉमिनी व्यक्तिचा एक आयडी प्रूफ जोडा. त्याच्या वाट्याचा भाग टक्केवारीमध्ये लिहा.

पडताळणीनंतर प्रक्रिया पूर्ण

आधार ओटीपीसह डॉक्युमेंटवर सही करा. नॉमिनी व्यक्तित्या माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यांचं नाव तुमच्या डिमॅट अकाऊंटशी जोडलं जाईल.

VIEW ALL

Read Next Story