अमेरिका

जगात अमेरिकेचं सैन्य सर्वात शक्तीशाली मानलं जातं. यूएस सरकारने 2019 मध्ये आपल्या सैन्यावर 693 अब्ज अमेरिकी डॉलर खर्च केले.

रशिया

जागतिक क्रमवारीनुसार दुसऱ्या क्रमांकावर रशियाचं लष्कर आहे. रशियाकडे 900,000 सक्रिय सैन्य आणि 4,100 पेक्षा जास्त विमाने आहेत

चीन

शक्तीशाली सैन्याच्या यादीत चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनकडे अमेरिका आणि रशियानंतर सर्वात जास्त रणगाडे आणि पाणबुड्यांचा ताफा आहे.

भारत

पहिल्या पाच देशांमध्ये भारतीय सैन्याचाही समावेश आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय लष्कराकडे सर्वाधिक रणगाडे 4,292 आणि सर्वाधिक लढाऊ 538 विमानं आहेत.

इंग्लंड

भारतापेक्षाही एक नंबर खाली म्हणजे पाचव्या क्रमांकावर इंग्लंडची आर्मी आहे. त्यांच्याकडे 82,040 नियमित पूर्णवेळ कर्मचारी तसेच 3,960 गुरखा आणि 29,740 राखीव कर्मचारी आहेत.

दक्षिण कोरिया

सहाव्या क्रमांकावर दक्षिण कोरियाच्या सैन्याचा नंबर लागतो. दक्षिण कोरियाकडे मोठ्या प्रमाणात पाणबुडी, प्राणघातक हेलिकॉप्टर आणि बाह्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत.

पाकिस्तान

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, टॉप टेनमध्ये पाकिस्तानचाही समावेश होतो. पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे.

जपान

शक्तीशाली सैन्याच्या यादीत जपान आठव्या क्रमांकावर आहे. चीन, रशिया आणि अमेरिकेनंतर जपानकडे लढाऊ हेलिकॉप्टरचा जगातील चौथा मोठा ताफा आहे.

फ्रान्स

नवव्या क्रमांकावर फ्रान्सचा नंबर लागतो. फ्रेंच सैन्य हे उच्च प्रशिक्षित आणि प्रोफेशनली ट्रेंड सैन्य आहे.

इटली

तर टॉप टेनमध्ये शेवटचा म्हणजे दहाव्या क्रमांकावर इटलीच्या आर्मीचा समावेश होतो. या सेनेमध्ये 165,500 लोक आर्मी, एअर फोर्स आणि नेव्हीमध्ये सेवा देत आहेत.

VIEW ALL

Read Next Story