Audi, BMW पेक्षाही महागडा किडा! एकाची किंमत ₹75 लाख; जाणून घ्या वैशिष्ट्यं

सर्वात महागडा किटक

जगातील सर्वात महागडा किटक म्हणून 'स्टॅग बिटल्स'चा (Stag Beetles) ओळखलं जातं.

रातोरात लखपती बनवू शकता

खरं तर हे 'स्टॅग बिटल्स' नावाचे किडे एखाद्याला रातोरात लखपती बनवू शकतात. या किड्यांसाठी लाखो रुपये खर्च करण्यास लोक तयार आहेत.

लक्झरी कार एवढी किंमत

एखाद्या ऑडी किंवा बीएमडब्ल्यूसारख्या लक्झरी कार एवढी किंमत एका 'स्टॅग बिटल'साठी मोजण्यास लोक तयार आहे.

एका 'स्टॅग बिटल' किड्याची किंमत 75 लाख रुपये इतकी असते. खरं तर हा किडा केवळ 2 ते 3 इंच लांबीचा असतो.

एवढी किंमत का?

'स्टॅग बिटल्स'चा वापर औषधांमध्ये केला जातो. मात्र त्यापेक्षाही का किडा दिसायला फारच वेगळा आणि दुर्मिळ असल्याने त्याची एवढी किंमत आहे.

केवळ द्रव्य स्वरुपाचा आहार

'स्टॅग बिटल्स' घन पदार्थ खात नाही. त्यांचा संपूर्ण आहार हा द्रव्य स्वरुपाचा असतो. झाडांमधील रस, फळांचा रस ते शोषूण घेतात.

उष्ण हवामान पोषक

'स्टॅग बिटल्स'ला थंड हवामान मानवत नाही. त्यांना उष्ण हवामान अधिक मानवतं.

नर मादीसाठी एकमेकांशी लढतात

'स्टॅग बिटल्स'मध्ये नर हा आकाराने अधिक मोठा असतो. त्याच्या नांग्या मोठ्या असतात. मदीसाठी दोन नर एकमेकांशी लढतात. जिंकणाऱ्या नर मादीसोबत राहतो.

VIEW ALL

Read Next Story