पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याचे रहस्य अद्याप पूर्णपणे उगलडलेले नाही. मात्र, पृथ्वीवर जीवसृष्टी कोणामुळे अस्तित्वात आहे हे मात्र संशोधकांनी शोधून काढले आहे.
सूर्य या ताऱ्यामुळे पृथ्वीवर सजीवाचे अस्तित्व टिकून आहे. सूर्य हा पृथ्वीला उर्जा देणारा तारा आहे.
वितळत्या धातूचे तापमान 3000 ते 3500 अंश सेल्सिअस पर्यंत असते. पृथ्वीवरील आग 450 ते 3000 अंश सेल्सियस इतकी उष्ण असू शकते.
पृथ्वीचा गाभा ज्याला इंग्रजीत कोअर ऑफ द अर्थ म्हटले जाते, त्याचे तापमान 5 हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते.
आकाशातून पृथ्वीवर कोसळणाऱ्या वीजेचं तापमान 27 हजार अंश सेल्सिअस इतकं असतं.
आता विचार करा पृथ्वीसह अख्ख्या सूर्यमालेला ऊर्जा देणाऱ्या सूर्याचं तापमान किती असेल.
सूर्याच्या गर्भाचे तापमान 15 लाख अंश सेल्सिअस आहे. तर बाहेरून सूर्य 10,000 अंश सेल्सिअस इतका उष्ण आहे.
सूर्याचं तापमान जाणून घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की माणूस कमाल 43 अंश सेल्सिअस तापमानावर जिवंत राहू शकतो.