नारळापासून तयार झालेलं सुकं खोबरं किंवा खोबऱ्यामध्ये स्निग्ध घटक अर्थात तेलाचं प्रमाणं अधिक असतं. ज्यामुळं ते पेट घेण्याची भीती असते. त्यामुळं विमानात खोबरं नेण्यास बंदी आहे.
गॅस कार्टरीज, ई सिगरेट किंवा गॅस लायटरही विमानात नेता येत नाही. हे पजार्थ ज्वलनशील असल्यामुळं त्यावर हे निर्बंध लागू आहेत.
बॅटरीवर चालणाऱ्या व्हीलचेअर किंवा बॅटकीवर चालणाऱ्या इतर उपकरणांना विमानात प्रवेश नसतो.
शॉट सर्किट किंवा जास्त तापून फुटण्याची भीती असल्यामुळं अनेक विमानसेवा कंपन्यांकडून पॉवरबँक, लिथियम धातू किंवा बॅटरी सेल नेण्यास बंदी घालण्यात येते.
बंद न होणारी विद्युत उपकरणंही विमानात नेता येत नाहीत. ही उपकरणं गरम होऊन फुटण्याचा धोका असतो.
पारा असणारं थर्मामीटर किंवा बॅरोमीटर नेत असताना ट्रान्सिटदरम्यान ते फुटून त्याचा पारा बाहेर लआला तर, विमानाला नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळ या गोष्टी विमानात नेता येत नाहीत.
सुरी, कातर, स्विस आर्मी नाईफ अशी धारदार शस्त्र किंवा तत्सम गोष्टी आणि आग निर्माण करणाऱ्या वस्तू, दगडही विमानातून नेता येत नाही.