'हॅलो, कोण बोलतंय?' कोणाचाही फोन आल्यावर पहिला शब्द आपल्या तोंडातून निघतो तो म्हणजे हॅलो'.
पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की हा हॅलो शब्द आला कुठून?
ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला.
त्यांच्या प्रेयसीचे नाव हॅलो होते आणि टेलिफोनचा शोध लागल्यावर त्याने पहिला शब्द 'हॅलो' बोलून तिचा नंबर डायल केला.
तेव्हापासून फोन कॉल करताना 'हॅलो' हे पारंपरिक ग्रीटिंग बनले आहे.
असे मानले जाते की हॅलो बोलल्यानं लोकांमधील परस्पर कडवटपणा दूर होतो.
1973 मध्ये योम किप्पूर युद्धादरम्यान झालेल्या संघर्षात हजारो सैनिक आणि नागरिकांनी प्राण गमावले.
जेव्हा युद्ध संपले, तेव्हा 'हॅलो' हा शब्द शांतता आणि सद्भावनेची पहिली अभिव्यक्ती म्हणून उदयास आला, ज्याने जागतिक हॅलो दिवसाची सुरुवात केली.