विराट, रोहित WC 2027 खेळणार की नाही? कसं असेल भारतीय क्रिकेटचं भविष्य

ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपवर सहाव्यांदा नाव कोरत भारतीय संघाच्या स्वप्नाचा चुराडा केला.

19 नोव्हेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेटने भारताचा पराभव केला.

अनेक भारतीय खेळाडूंसाठी हा वर्ल्डकप शेवटची संधी होती. पुढील वर्ल्डकप 2027 मध्ये होणार आहे.

2027 चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, नामिबिया, झिम्बॉब्वेमध्ये खेळला जाणार आहे. या 4 वर्षात भारतीय संघातील अनेक खेळाडूंचं वय वाढेल.

पण जर त्यांचा फिटनेस कायम राहिला तर मात्र ते 2027 मध्येही मैदानात दिसतील.

सचिन तेंडुलकरने वयाच्या 40 तर धोनीने 38 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे.

धोनी सध्या आयपीएलमध्ये सक्रीय आहे. वयाच्या 42 व्या वर्षी संघाचं नेतृत्व करताना त्याने CSK ला जिंकवलं आहे.

विराट कोहली 35 वर्षांचा असून, पुढील वर्ल्डकपला 39 वर्षांचा असेल. पण त्याचा फिटनेस पाहता तो 2027 चा वर्ल्डकप खेळू शकतो.

रोहित शर्माने वयाची 36 वर्षं ओलांडली आहेत. मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार सध्या 33 वर्षांचे आहेत.

रवींद्र जडेजा सध्या 34 वर्षांचा असून, के एल राहुलचं वय 31 वय आहे. सध्या भारतीय संघात शुभमन गिल सर्वात तरुण (24) आहे.

आर अश्विन सध्या भारतीय संघातील सर्वात जास्त वयाचा (37) खेळाडू आहे. अशा स्थितीत फिटनेस आणि फॉर्म या दोन गोष्टींवर या सर्वांचं भविष्य ठरवेल.

VIEW ALL

Read Next Story