महत्त्वाच्या पदांवर केलय काम

जेम्स मारापे मे 2019 मध्ये पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान झाले. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत आहेत. 2020 मध्ये अविश्वास प्रस्तावाद्वारे त्यांचे सरकार पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आले होते. ते पापुआ न्यू गिनीचे 8 वे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या कॅबिनेट पदांवर काम केले आहे.

मारापे यांचे शिक्षण किती?

जेम्स मॅरापे यांनी पापुआ न्यू गिनी विद्यापीठातून 1993 मध्ये कला शाखेत पदवी प्राप्त केली आहे. तसेच मारापे यांनी पर्यावरण विज्ञान आणि व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.

गेल्या चार वर्षांपासून पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान

जेम्स मारापे हे 2019 पासून पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान आहेत. जेम्स मरापे हे पांगू या राजकीय पक्षाचे नेते आहेत.त्यांनी 2019 मध्ये पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि नंतर पांगू पक्षामध्ये सामील झाले

पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

पापुआ न्यू गिनीला पोहोचलो आहे. पंतप्रधान जेम्स मारापे यांनी विमानतळावर येऊन माझे स्वागत केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे एक अतिशय विशेष स्वागत आहे जे माझ्या नेहमी लक्षात राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पापुआ न्यू गिनीला भेट देणारे पहिले पंतप्रधान

पापुआ न्यू गिनीला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. एवढेच नाही तर विमानतळावरच पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

पंतप्रधान मोदींसाठी मोडली परंपरा

पापुआ न्यू गिनीमध्ये सूर्यास्तानंतर आलेल्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत केले जात नाही. पण पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान झाले नतमस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पापुआ न्यू गिनी येथे गेले होते. तेथे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे स्वागत केले.

कुठे आहे पापुआ न्यू गिनी?

पापुआ न्यू गिनी हा इंडोनेशियाजवळील पॅसिफिक महासागर क्षेत्रातील एक स्वतंत्र देश आहे. हा दक्षिण पश्चिम पॅसिफिक महासागर क्षेत्रातील बेटांचा समूह आहे.

पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे

VIEW ALL

Read Next Story