श्रीमंतीच श्रीमंती! जगातील 10 देश जिथे आहेत सोन्याच्या खाणी
अल्जेरिया हा देश या यादीमध्ये पहिल्या स्थानाव असून, 2023 मध्ये या देशाकडे 174 मेट्रिक टन इतकं सोनं होतं.
सोन्याचे दागिने आणि एकंदर सोन्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असणारा देश आहे दक्षिण आफ्रिका. 2023 मध्ये इथं 125 मेट्रिक टन सोनं होतं.
लिबियाकडे 117 टन सोनं होतं. याची किंमत साधारण 6 बिलियन डॉलर इतकी आहे. त्यामागोमाग यादीत येणारं नाव आहे इजिप्त (80.73 मेट्रिक टन सोनं).
नायजेरियाकडे 2023 मध्ये 21.37 मेट्रिक टन इतकं सोनं होतं. याची किंमत साधारण 1 बिलियन इतकी आहे.
घाना या देशानं गोल्ड रिजर्व आणखी भक्कम करत 2023 मध्ये या देशाकडे 8.74 मेट्रिक टन इतकं सोनं होतं.
ट्युनिशिया आणि मोजांबिक देशांमध्ये 2023 ला अनुक्रमे 6.84 मेट्रिक टन आणि 3.94 मेट्रिक टन इतकं सोनं होतं.