हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी तमिळनाडूमध्ये असलेल्या अम्मनकुडी येथे झाला.
हेमा मालिनी यांचे वडील वी.एस रामानुजम हे सरकारी नोकरी करत होते. तर आई जया या गृहिणी.
हेमा मालिनी यांना दोन भाऊ असून आर. के. चक्रवर्ती आणि आर. जे. चक्रवर्ती अशी त्यांची नावं आहे.
हेमा मालिनी यांनी वयाच्या 15 व्या वर्षी 'Idhu Sathiyam' या चित्रपटातून तमिळ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
हेमा मालिनी यांनी राज कपूर यांच्यासोबत सपनो का सौदागर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
हेमा मालिनी यांनी त्यानंतर संजीव कपूर आणि जितेंद्र यांच्या लग्नाच्या मागणीला नकार दिला होता.
1975 साली प्रदर्शित झालेल्या 'शोले' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्यावर प्रेम झालं. त्यानंतर 1979 मध्ये इस्लाम स्विकारत त्या दोघांनी लग्न केलं.