अंतराळयान, अवकाश या सर्वच संकल्पना अतिशय रंजक वाटतात. किंबहुना अंतराळात जाणाऱ्यांविषयी सबंध जगाला कुतूहल असतं.
याच कुतूहलातून समोर येणारा एक प्रश्न म्हणजे, अंतराळवीर तिथं दूर अवकाशाता खातात तरी काय?
अवकाशात असताना अंतराळवीरांना दर दिवसाच्या अनुषंगानं 1.07 किलोग्रॅम खाणं दिलं जातं. यामध्ये 450 ग्रॅम वजन कंटेनरचच असतं.
गुरुत्वाकर्षाणाचा नियम लक्षात घेत त्यांच्यासाठी हा खाण्याचा बेत आखला जातो. हे जेवण त्यांनी दोन दिवसांत संपवणं अपेक्षित असतं.
अंतराळातील हे जेवण रेडिएशन रोखून धरणाऱ्या कंटेनरमध्ये केलं जातं.
अंतराळातील खाद्यपदार्थांमध्ये शेंगदाणे, कुकीजसारख्या गोष्टी फ्लेक्सिबल प्लॅस्टिक पाऊचमध्ये ठेवलं जातं.
आहे की नाही ही कमाल बाब, विचार करा तुमच्या ब्रेकफास्टहूनही कमी असतं अंतराळवीरांचं जेवण