पेरूमध्ये सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6 हे पोषक तत्वे जास्त प्रमाणात आढळतात.
पेरू रोज खाल्ल्याने आरोग्याचे फायदे मिळतात आणि ते खाण्याची योग्य वेळ कोणती आहे हे जाणून घेऊयात.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
पेरूचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते, त्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी असतो.
व्हिटॅमिन ए असलेल्या पेरूचे दररोज सेवन केल्याने दृष्टी सुधारते आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
पेरूमध्ये मुबलक प्रमाणात लोह असल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
पेरूमध्ये भरपूर फायबरचे गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठता, अपचन, पित्त अशा कोणत्याही प्रकारची पचनाची समस्या असेल तर तुम्ही पेरू खाऊ शकता.
तज्ज्ञांच्या मते, पेरू नाश्तानंतर एक ते दीड तास आणि दुपारी जेवणाच्या 1 तास आधी हीच पेरू खाण्याची योग्य वेळ मानली जाते.
तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी पेरू खाल्ल्याने सर्दी, तापासारख्या समस्या होऊ शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)