पावसाळ्यात केस गळत असतील तर 'या' टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात अनेकजण केस तुटण्याची आणि गळण्याची तक्रार करत असतात.

पावसाळ्यात केस का गळतात?

केसं गळणं पावसाळ्यात सामान्य बाब आहे. याचं कारण पावसाळ्यात हवेतील ओलसरपणा वाढतो, ज्यामुळे केस कमुकवत होतात.

त्वचेवरील फंगल आणि बॅक्टेरियल इंफेक्शन

हवेतील अधिक ओलसरपणा असल्याने डोक्यावरील त्वचेवर फंगल आणि बॅक्टेरियल इंफेक्शन होऊ शकतं, जे केस गळतीचं कारण ठरतं.

पावसात भिजणं केसांसाठी नुकसानकारक

जर तुम्हाला पावसात भिजण्यास आवडत असेल तर ते तुमच्या केसांसाठी जास्त नुकसानकारक ठरु शकतं.

केसांमधील कोंडा

पावसाळ्यात केसांमध्ये कोंडाही होतो, जे केस गळण्यासाठी कारणीभूत ठरतात.

'या' टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात केसगळती रोखण्यासाठी काही टिप्स तुम्हाला मदतशीर ठरु शकतात.

केस नियमितपणे धुवा

केस स्वच्छ ठेवण्यासाठी आपले केस नियमितपणे धुवा. केस धुण्यासाठी तुमच्या केसांना सूट होईल असाच शॅम्पू वापरा.

केस व्यवस्थित सुकवा

विंचरण्याआधी किंवा झोपण्याआधी केस सुकवून घ्या. भिजलेल्या केसांमध्ये फंगल इंफेक्शन आणि तुटण्याचा धोका असतो.

हेअर ड्रायर वापरणं टाळा

जर तुमचे केस गळत असतील तर वेगवेगळ्या हेअरस्टाइल कऱणं ते घट्ट बांधणं टाळा. तसंच हेअर ड्रायरचा वापरही कमी करा.

मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करा

केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करा. तसंच हलक्या हाताने केस विंचरा.

भरपूर पाणी प्या

तसंच केसगळती थांबवण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्या. आहारही नीट करा.

त्वचारोग तज्ज्ञांची भेट घ्या

पण जर यानंतरही तुमची केसगळती थांबत नसेल तर मात्र त्वचारोग तज्ज्ञांची भेट घेत योग्य सल्ला घ्या.

VIEW ALL

Read Next Story