हमासने इस्रायलवर हल्ला केलाय. त्यांनी इस्रायलवर 5 हजारहून अधिक रॉकेट डागले. ज्यात इस्रायलचे 300 नागरिक मारले गेले.
हमासचा हल्ला सुरु आहे. इस्रायलदेखील प्रत्युत्तर देत आहे. पण हे दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू का आहेत? तुम्हाला माहिती आहे का?
हमास म्हणजे Hamas चा फुलफॉर्म हरकतुल मुकावमतुल इस्लामिया आहे. इस्लामी प्रतिरोध आंदोलन असा याचा अर्थ आहे.
हमास फिलिस्तानी सुन्नी मुस्लिमांची एक सशस्त्र संघटना आहे. यांचे इस्रायलच्या पश्चिमी सिमेवरील गाझापट्टीवर कंट्रोल आहे.
हमासची स्थापना 1987 मध्ये फिलिस्तानी इंतिफादा म्हणजेच फिलिस्तानी बंडादरम्यान झाली. शेख अहमद यासीन असे हमासच्या संस्थापकाचे नाव आहे.
शेख अहमद यासीनने मिस्र येथे राहून इस्लामचे शिक्षण घेतले आणि मुस्लिम धर्मगुरु बनला. यानंतर मुस्लिम ब्रदरहूड कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली.
शेख अहमद यासीनची संघटना आणि मुस्लिम ब्रदरहूडची विचारधारा मिळतीजुळती आहे. याची स्थापना मिस्रमध्ये 1920 मध्ये झाली.
इस्रायलचा नायनाट करणे आणि फिलिस्तानसहित संपूर्ण इस्रायलमध्ये इस्लाम शासन स्थापित करणे हे हमासचे उद्दीष्ट आहे.
इस्रायल, अमेरिका, ईयू, कॅनडा, जपान आणि मिस्र यांनी हमासला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हमासला इराण, लेबनान, सिरिया आणि हिजबुल्लाहचे समर्थन आहे.