कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
ट्रूडो यांच्या या आरोपामुळे ते सध्या भारतामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. भारताने ट्रूडोंचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळले आहेत.
सध्या ट्रूडो यांच्याबद्दल भारतीयांना फार उत्सुकता असून त्यांच्या पगारासंदर्भातही अनेकजण सर्च करताना दिसत आहेत. हेच आज आपण जाणून घेऊयात...
जस्टिन ट्रूडो हे 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान आहेत. पहिल्यांदा ते लिबरल पार्टीकडून संपूर्ण बहुमताने निवडून आले.
मात्र जस्टिन ट्रूडो 2019 आणि 2021 मध्ये अल्पमतात गेले. तेव्हापासून ते इतर पक्षांची मदत घेऊन मित्र पक्षांबरोबर स्थापन केलेलं सरकार चालवत आहेत.
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचं रोजचं वेतन हे 44 हजार 895 रुपये इतकं आहे.
महिन्याला 9.72 लाख रुपयांची रक्कम जस्टिन ट्रूडो यांना वेतन म्हणून मिळते.
याचाच अर्थ जस्टिन ट्रूडो एका वर्षात केवळ पगार म्हणून 1 कोटी 16 लाख 64 हजार रुपये वेतन घेतात.
जस्टिन ट्रूडो हे पंतप्रधान असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची, विजेच्या वापराची, पाण्याची आणि फोन बिलाची जबाबदारी सरकारवर असते. यासाठी विशेष निधी राखीव ठेवलेला असतो.
जस्टिन ट्रूडो यांच्या ताफ्यामध्ये किमान 10 कार आणि 4 मोटरसायकल असतात.