संपत्तीमुळे नेहमीच चर्चेत अंबानी

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि देशातील सर्वात मौल्यवान कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांच्या व्यवसाय आणि संपत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात.

अंबानींच्या घराची जोरदार चर्चा

अंबानींच्या संपत्तीची जितकी चर्चा होते, तितकेच त्यांचे घर अँटिलिया देखील प्रसिद्ध आहे. पण या घराचे नाव अँटिलिया का ठेवण्यात आले आणि या नावाचा अर्थ काय आहे?

अंबानींनी कसे ठेवले नाव?

अटलांटिक महासागरातील एका पौराणिक बेटावरून मुकेश अंबानी यांच्या घराचे नाव अँटिलिया ठेवण्यात आले आहे.

अँटिलियाच्या नावाचा अर्थ काय?

अँटिलिया हा पोर्तुगीज शब्द 'अँटे इल्हा' या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘आइलॅंड ऑफ द अदर’ आणि ‘अपोजिट ऑफ आइलॅंड’ होतो

कोणी बांधले अँटिलिया?

अँटिलिया 2010 मध्ये पूर्ण झाले आणि शिकागो वास्तुविशारद पार्किन्स यांनी डिझाइन केले होते, तर ऑस्ट्रेलियन बांधकाम कंपनी 'लॅंग्टन होल्डिंग' यांनी ते बांधले होते.

घर बांधायला किती खर्च आला?

हे घर तयार करण्यासाठी अंदाजे 11,000 कोटी रुपये खर्च आला आहे. या इमारतीचे सहा मजले केवळ अंबानी कुटुंबाच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी आहेत. 4,00,000 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेली 27 मजली इमारत आहे.

राजवाड्यासारखा दिसतो अॅंटिलिया

कोणत्याही सणाच्या निमित्ताने अँटिलियाच्या सजावटीची खूप चर्चा होते.अँटिलिया ही 27 मजली इमारत आहे. वरच्या मजल्याच्या अगदी खालच्या मजल्यावर अंबानी कुटुंब राहते.

अनेक लक्झरी सुविधा

पार्किंगच्या वरच्या मजल्यावर सिनेमा हॉल आणि त्याच्या वर आउटडोअर गार्डन आहे. अंबानींच्या घरात 9 लिफ्ट आहेत. यामध्ये 3 हेलिपॅड, 4 स्विमिंग पूल, जिम, मंदिरासह अनेक गोष्टी आहेत.

VIEW ALL

Read Next Story