भौतिकशास्त्र क्षेत्रातील 2023 सालचा नोबेल पुरस्कार यंदा तिघांना विभागून जाहीर झाला आहे.
पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्राउझ अन् अॅन ल'हुलियर यांना हा पुरस्कार जाहीर झालाय.
इलेक्ट्रॉन्सचा अतिशय सूक्ष्म पातळीवर अभ्यास केल्याबद्दल या तिघांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यातील महत्त्वाची संकल्पना म्हणजे एटोसेकंद...
एटॉसेकंद हे विस्मयकारकपणे कमी वेळेचे एकक आहे. एका सेकंदाच्या एक क्विंटिलीयनव्या भाग शोधण्यात यश मिळालं आहे.
एटोसेकंद सेकंदाचा 1,000,000,000,000,000,000 वा भाग आहे. तो या तिन्ही संशोधकांनी शोधून काढलाय.
भौतिक जगाच्या काही मूलभूत पैलूंची तपासणी आणि हाताळणी करण्यासाठी एटोसेकंदचा वापर केला जातोय.