बर्फाच्या वादळामुळं अमेरिकेचा चक्काजाम! हे Arctic Blast आहे तरी काय?
आर्क्टिक ब्लास्टमुळं अमेरिकेत तापमान उणे 18 अंशांहून कमी झालं असून, यामुळं येथील जनजीवनही विस्कळीत झालं आहे. ज्यामुळं येथील अनेक भागांशी असणारा संपर्कही तुटला आहे.
अमेरिकेतील या परिस्थितीमुळं बहुतांश भागांमध्ये बर्फाची तीन मीटरपर्यंतची चादर पाहायला मिळत आहे. रक्त गोठवणारी ही थंडी उत्तपेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं आणखी वाढताना दिसत आहे.
अमेरिकेच्या मध्य पश्चिम आणि ग्रेट लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत असून, रॉकी माउंटंसच्या पूर्वेकडे बर्फाचं वादळ आलं आहे. पश्चिमी किनारपट्टीवरही या हिमवादळाचा तडाखा बसताना दिसत आहे.
फ्लोरिडावरून या शीतलहरी पुढे दक्षिणेला वाहत असून, त्यामुळं या भागांमध्ये प्रचंड बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आर्क्टिक ब्लास्टलाच आर्क्टिक बॉम्ब असंही म्हणतात. यामध्ये थंड हवेचा झोत उष्णकटीबंदीय प्रदेशाच्या दिशेनं वाहून तिथं 24 तासांच्या आत तापमान उणेच्या घरात पोहोचतं. चहूबाजूंना बर्फाची चादर पाहायला मिळते.
आर्क्टिक ब्लास्टमुळं हे परिणाम होत असून, याचा अर्थ आर्क्टिकवरून येणाऱ्या शीतलहरी असा होतो. आर्क्टिकवरून येणारी थंड हवा अर्थात जेट स्ट्रीम अमेरिकेच्या वरील वातावरणावर मोठे परिणाम करून दात आहे.
हिवाळ्याच्या काळात अमेरिकेमध्ये अशी परिस्थिती उदभवते, जिथं अमेरिकेमध्ये या जेट स्ट्रीम वाहू लागतात. यापूर्वी 1983 मध्ये कोल्ड स्नॅप आणि 2014 पोलर वॉर्टेक्समध्ये तापमान प्रचंड कमी झालं होतं. 2022 मध्ये इथं पोलर बॉम्ब वादळ आलं होतं.