सूर्य हा सौरमालेतील सर्वात मोठा तारा आहे. पृथ्वी हा सौरमालेतील एकमेव असा ग्रह आहे ज्यावर जीवसृष्टीचा वावर आहे.
आकारमानानुसार पाहायचं झाल्यास सूर्य पृथ्वीच्या 109 पट मोठा आहे. थोडक्यात एकट्या सूर्यामध्ये पृथ्वीइतके 109 ग्रह सहज सामावतील.
पृथ्वीपासून सूर्य जवळपास 15 कोटी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पण, हे अंतर कमी होतंय हे मात्र विसरून चालणार नाही.
सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर ज्या दिवशी कमी असतं त्या दिवसाला उपसौर अर्थात Perihelion म्हणतात. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीचं अंतर 14.70 कोटी किलोमीटर इतकं असतं.
सूर्यमालेमधून हा सूर्यच गायब झाला तर, पृथ्वीवर अंधाराचं साम्राज्य असेल. त्याशिवाय पृथ्वीवरी गुरुत्वाकर्षणही नाहीसं होईल.
सूर्य नसल्यास पृथ्वी अवकाशात तिच्या कक्षेनुसार चालण्याऐवजी इतरत्र तरंगत राहील. तिचा वेग 3 किलोमीटर प्रति सेकंद इतका असेल.
सूर्य सौरमालेतून नाहीसा झाल्यास पृथ्वीवरील तापमान अचानक उणे 20 अंशावर पोहोचेल. पुढे ते उणे 100 अंशांपर्यंतही जाऊन जीवसृष्टीचाच ऱ्हास होईल.