अंत्यसंस्कारासाठी ऑर्डर करा हा ड्रेस! तिची पोस्ट अन् तो ड्रेस पाहून संतापाची लाट

विचित्र पोस्टमुळे चर्चेत

सध्या अमेरिकेतील एक टिकटॉकर चांगलीच चर्चेत आहे ती तिच्या एक विचित्र पोस्टमुळे. ही पोस्ट जगभरात चर्चेचा विषय ठरतेय.

अंत्यसंस्कारासाठीचा ड्रेस

एका कापड्यांच्या ब्रॅण्डची मालकीण असलेल्या या महिलेने टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये तिने परिधान केलेला ड्रेस हा फ्युनरल ड्रेस म्हणजेच अंत्यसंस्कारासाठीचा ड्रेस असल्याचं म्हटलं आहे.

अंगप्रदर्शन करणारा ड्रेस

या महिलेने परिधान केलेला ड्रेस हा शॉर्ट वन पीस ड्रेस आहे. या ड्रेसच्या मध्यभागामध्ये केवळ झिकझॅक पद्धतीच्या लेस असून हा फारच अंगप्रदर्शन करणारा ड्रेस आहे.

तळपायाची आग मस्तकी

या महिलेचा हा ड्रेस आणि तिने ज्या पद्धतीने फ्युनरल ड्रेस म्हणून त्याचं प्रमोशन केलं आहे ते पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकी गेली आहे.

अंत्यसंस्कारासाठी की पब पार्टीसाठी

हा ड्रेस परिधान करुन अंत्यसंस्काराला कसं जायचं? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. हा अंत्यसंस्कारासाठी आहे की पब पार्टीसाठी असा प्रश्न अन्य एकाने विचारला आहे.

अनेक ऑर्डर्स

या ड्रेसच्या अनेक ऑर्डर्स आल्याचा दावा महिलेने केला आहे. हा ड्रेस अंत्यसंस्कारासाठी योग्य असल्याचा महिलेचा दावा आहे.

अयोग्य निवड

अंत्यसंस्कारासाठी हा फारच अयोग्य आणि चुकीचा ड्रेस असल्याचं अनेकांनी कमेंट करुन म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story