तिरंग्याशी साम्य असलेले 'हे' 3 झेंडे कोणत्या देशांचे? तुम्हाला माहितये का उत्तर?

Swapnil Ghangale
Feb 24,2024

जगात 200 हून अधिक देश

जगभरामध्ये 200 हून अधिक देश आहेत. प्रत्येक देशाचा ध्वज हा त्याची वेगळी ओळख अखोरेखित करतो.

अनेक देशांचे झेंड्यांमध्ये साम्य

मात्र जगात असे अनेक देश आहेत ज्यांचे राष्ट्रध्वज थोड्याफार फरकाने सारखेच आहेत.

भारतही याला अपवाद नाही

काही देशांच्या झेंड्यांमध्ये तर इतकं सामन्य आहे की पकटन देशाचं नाव सांगता येत नाही. भारताचा झेंडाही याला अपवाद नाही.

तुम्हाला ओळखता येतील हा देश?

सध्या सोशल मीडियावर भारतीय झेंड्याप्रमाणे दिसणाऱ्या झेंडे ओळखणारी एक पोस्ट व्हायरल होतेय. वर दिसणारे चारही झेंडे कोणत्या देशांचे आहेत तुम्ही ओळखू शकता का? (फोटो सौजन्य- stats_feed ट्वीटरवरुन)

एक झेंडा सहज ओळखला असेल तुम्ही

चला आम्ही तुम्हाला सांगतो. अर्थात दुसऱ्या क्रमांकाचा झेंडा तुम्ही ओळखला असेलच. तो भारताचा झेंडा आहे.

पहिल्या क्रमांकाचा झेंडा कोणत्या देशाचा?

पहिल्या क्रमांकाचा झेंडा हा नायझर देशाचा झेंडा आहे. यामध्ये भारतीय झेंड्यातील अशोकचक्राऐवजी केवळ भगवं वर्तुळ आहे.

तिसरा झेंडा कोणत्या देशाचा?

फोटोत तळाशी दिसणारा 3 क्रमांकाचा झेंडा हा आयलॅण्डचा आहे.

चौथ्या क्रमांकाचा झेंडा या देशाचा

चौथ्या क्रमांकाचा झेंडा हा आयव्हरी कोस्ट या देशाचा आहे.

तुमची किती उत्तरं बरोबर आली?

तुम्हाला या चारपैकी किती झेंडे ओळखता आले पोस्टवर कमेंट करुन नक्की सांगा.

VIEW ALL

Read Next Story