प्रसिद्ध नृत्यांगणी गौतमी पाटील काही ना काही कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असते. गौतमीचा डान्स सुरू झाली की, अनेक पोरं तिच्या तालावर थिरकतात.
आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रर्माचं नियोजन केलं होतं.
जुन्नर तालुक्यातील केवाडी येथील कार्यक्रमात गौतमीने हजेरी लावली होती. त्यावेळी तिची ओळख एका चिमुकलीशी झाली.
आयोजकांनी या वैष्णवी नावाच्या चिमुकलीची ओळख गौतमी पाटीलसोबत करून दिली.
चिमुकलीचं नाव वैष्णवी असल्याचं कळल्यावर गौतमी पाटीलने मोठा खुलासा केला.
गौतमी पाटीलने माझं जन्मनाव देखील वैष्णवी असल्याचं म्हटलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गौतमीच्या आडनावावरून वाद झाल्याचं दिसून आलं होतं. गौतमीचं आडनाव चाबुकस्वार असल्याची टीका तिच्यावर झाली होती.