नासाने समुद्रात वाहणाऱ्या नदीचे फोटो प्रसिद्ध केले आहेत .
ते फोटो पाहून असे भासत आहे जसे काही चहाची नदी वाहत आहे.
नासाने प्रसिद्ध केलेली उपग्रह प्रतिमा अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील विन्या बेची आहे.
ही नदी दलदल आणि जंगलांमधून वाहते. त्यावेळी वनस्पतीसह अनेक सेंद्रिय पदार्थ नदीमध्ये मिसळतात.
या कारणांमुळे नदीचा रंग गढूळ झाल असून ती समुद्राकडे सरकत आहे.
हे दृश्य 2020 साली नासाने अंतराळातून टिपले होते.
सप्टेंबर 2020 मध्ये सॅली चक्रीवादळ अलबामामध्ये आले. या चक्रिवादळानंतर लगेचच चहाची नदीचे छायाचित्र काढण्यात आले.