थायलंडमध्ये कोणी अंतर्वस्त्र खास करुन अंडरवेअर न परिधान करता घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
स्वित्झर्लंडमधील लोकांना रविवारी गाडी धुता येत नाही. येथे रविवारी कार वॉशिंगवर बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.
रशियामध्ये अस्वच्छ गाडी चालवण्यावर बंदी आहे. अशी गाडी चालवण्यास मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातो.
इंग्लंडमध्ये एक फार विचित्र नियम आहे. येथे 10 वर्षांहून कमी वयाच्या मुलांनी विर्वस्त्र पुतळे पाहण्यावर बंदी आहे.
जपानमध्ये रस्त्यावर साचलेलं पाणी एखाद्यावर उडवणं कायद्याने गुन्हा आहे. खड्ड्यावरुन कार चालवताना इतरांवर पाणी उडणार नाही अशापद्धतीने ती चालवणं बंधनकारक आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मियामीमध्ये प्राण्यांची नक्कल करणे त्यांना चिडवणे कायद्याने गुन्हा आहे. त्यांची नक्कल करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागतं.
फिजी या छोट्याश्या देशात टॉपलेस होऊन सनबाथ घेणं कायद्याने गुन्हा आहे. लोकांनी खांद्यापर्यंत कपडे घालणे येथे बंनकारक आहे.
अमेरिकेतील ओकलाहोमामध्ये सुरक्षा विभागामध्ये काम करणाऱ्या कुत्र्यांना त्रास देणं हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी थेट तुरुंगात जावं लागू शकतं.
सिंगापुरमध्ये च्युइंगम खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. च्युइंगम खाणाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींबद्दल फारच विचित्र नियम आहेत. काही देशांमध्ये कपड्यांबद्दल तर काही देशांमध्ये गाड्यांबद्दलचे नियम हे चक्रावून टाकणारे आहेत. अशाच काही अजब गजब नियम आणि कायद्यांबद्दल जाणून घेऊयात