19 ऑगस्ट 2024 ला रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी सुपरमून दिसणर आहे.
चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा आपल्याला सुपरमून दिसतो.
चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदु पेरीगी आहे आणि सर्वात लांबचा बिंदु एपोगी आहे. प्रत्येक महिन्याला चंद्र या दोन्ही बिंदु जवळून जातो.
सुपरमूनच्या वेळी चंद्र 14% नी मोठा आणि 30% ने जास्त अधिक प्रकाशित दिसतो.
कारण पृथ्वीच्या जवळ असताना सूर्याची किरणे चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन पृथ्वीवर पोहोचतात.
आपल्याला चंद्राचा भ्रम दिसतो. चंद्र जसजसा उगवतो आणि क्षितिजावर मावळतो तेव्हा तो आणखी मोठा दिसतो.
सुपरमूनला पेरिगी मून असेही म्हणतात.
एका वर्षात 3 किंवा 4 वेळेस सुपरमून पहायला मिळतो. प्रत्येक पौर्णिमेला सुपरमून दिसत नाही.