यंत्रणांकडून स्पर्म डोनरचा शोध

बॅन असतानाही एक स्पर्म डोनर थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. अजूनही तो स्पर्म डोनेट करत आहे. यंत्रणा सध्या त्याचा शोध घेत आहेत.

Jun 21,2023

सीरियल स्पर्म डोनर

नेदरलँड्सचा 41 वर्षीय जोनाथन जॅकब मिजर हा 'सीरियल स्पर्म डोनर' म्हणून ओळखलं जातं.

कोर्टाचा मुलं जन्माला न घालण्याचा आदेश

नुकतंच नेदरलँडच्या एका कोर्टाने आदेश दिला होता की, जोनाथन आता मुलं जन्माला घालू शकत नाही.

जगभरात 500 ते 600 मुलं

कारण एक स्पर्म डोनर म्हणून त्याची जगभरात 500 ते 600 मुलं आहेत.

....तर 90 लाखांचा दंड

कोर्टाने सांगितलं होतं की, जर जोनाथनने आदेशाचं पालन केलं नाही तर त्याला 90 लाखांचा दंड ठोठावला जाईल. पण यानंतर जोनाथन लपून स्पर्म डोनेट करत होता.

नेदरलँडमध्ये ब्लॅक लिस्टेड

त्याने सीमेनच्या माध्यातून शेकडो मुलांना जन्माला घातलं आहे. अशाप्रकारे तो या वडिलांचा बायोलॉजिकल वडील झाला आहे. नेदरलँडमध्ये तर स्पर्म डोनेशसाठी त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात आलं आहे.

जोनाथनची जगभरात मुलं

असं सांगितलं जातं की, जोनाथनची जर्मनीत 80, बेल्जियममध्ये 35, अर्जेटिनात 4, ऑस्ट्रेलियात 2 आणि नेदरलँडमध्ये 375 मुलं आहेत.

इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क

जोनाथनने जगभरातील 13 फर्टिलिटी क्लिनिकमध्ये स्पर्म डोनेट केल्याचा दावा केला जात आहे. लोक इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क करतात.

आधीपासून मूल असणाऱ्यांनाच स्पर्म डोनेट

ज्या महिलांना आधीपासून मूल आहे त्यांनाच आपण स्पर्म डोनेट करत असल्याचं जोनाथनचं म्हणणं आहे. तो लवकरच सर्बिया आणि इटलीत जाणार आहे.

'कोणाकडूनही पैसे घेत नाही'

मी कोणाकडूनही पैसे घेत नाही. लोक जे आपल्या मनाने देतात ते मी मी ठेवतो. कोणी विमानाचं तिकिट करुन देतं तर कोणी कॅमेरा, मोबाइल गिफ्ट करतं असं तो सांगतो.

"मला कुटुंब सुरु करायचं आहे"

मला आपलंही कुटुंब सुरु करायचं आहे. 5 मुलांना जन्म देण्याचा मी विचार करत आहे असं तो सांगतो.

VIEW ALL

Read Next Story