खरेदी करणार का?

खनिजांचा साठा, अनेक गोष्टी करण्यासाठी वाव... विकायला काढलंय अख्खं बेट; खरेदी करणार का?

खाडीच्या मध्यभागी बेट

(San Francisco) सॅन फ्रान्सिस्कोच्या खाडीच्या मध्यभागी साधारण 5.8 एकरांच्या एका बेटाची विक्री करण्याची जाहिरात निघाली आहे. (Red Rock Island) असं या बेटाचं नाव.

विचारात आहात का?

तुम्हीही हे बेट खरेदी करण्याच्या विचारात आहात का? तर लक्षात घ्या ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2.5 कोटी डॉलर इतका खर्च येणार आहे. 2015 मध्ये या बेटाची किंमत 50 लाख डॉलर इतकी होती. पण, कालांरानं ही किंमत वाढली.

वारसा

अलास्कामध्ये राहणाऱ्या ब्रॉक डर्निंग यांच्याकडे या बेटाची मालकी आहे. वडिलांकडून वारसा म्हणून मिळालेल्या या बेटावर त्यांनी मागच्या 22 वर्षांमध्ये फेरफटका मारलेला नाही.

आईसाठी मोठा निर्णय

ब्रॉक डर्निंग यांची आई आता उतारवयात असून, तिच्या काळजीसाठी म्हणून ते आर्थिक मदतीचं माध्यम शोधत आहेत. परिणामी ते या बेटाची विक्री करण्याच्या विचारात आहेत.

पहिली खरेदी

रेड रॉक, सील रॉक्स, ट्रेजर आयलंड, येरबा बुएना आणि अलकत्राज अशी बेटं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असून, त्यांची मालकी खासगी आहे. 1964 मध्ये हे बेट सर्वप्रथम ग्लिकमेन नावाच्या एका व्यक्तीनं 50 हजार डॉलरमध्ये खरेदी केलं होतं.

खनिजसाठे

पुढे त्यानं हे बेट ब्रॉक यांच्या वडिलांना विकलं. सध्या या बेटावर एक वृक्ष, एक समुद्रकिनारा आणि तटरक्षक दलाचं निर्मनुष्य आवार आहे. वीज आणि पाण्याची सोय इथं नाही. खनिजसाठ्यांचा भरणा असणाऱ्या या बेटावर 1900 मध्ये खाणकामही सुरु करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

VIEW ALL

Read Next Story