शांतीपूर्ण आंदोलनाचं आवाहन

पीटीआयचे उपाध्यक्ष कुरेशी यांनी इम्रान खान यांच्या समर्थकांना शांतीपूर्ण आंदोलन करण्याचं आव्हान केलं आहे.

समर्थक आक्रमक

इम्राम खान समर्थकांमध्ये इतकं असंतोषाचं वातावरण आहे की त्यांनी थेट पाक सेना कमांडरच्या घरावर मोर्चा नेला.

पाकिस्तानात कलम 144

सध्या सुरू असलेल्या हिंसाचारामुळे पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे

एअरबेसवर हल्लाबोल

पाकिस्तानातील मियांवली एअरबेसवरील एका डमी विमानाला आंदोलकांनी आग लावली.

रेडिओ स्टेशन इमारतीला आग

पाकिस्तानातील पेशावरमध्ये इम्रान खान यांच्या समर्थकांनी रेडिओ स्टेशनच्या इमारतीला आग लावली

समर्थकांकडून जाळपोळ

इम्रान खानच्या समर्थकांकडून रस्त्यावर जाळपोळ सूरू करण्यात आलीय. पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि PTI प्रमुख इम्रान खान यांना पाकिस्तान पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली. त्यानंतर इम्रान खानच्या समर्थकांनी देशभरात हिंसक आंदोलन सुरू केलंय.

VIEW ALL

Read Next Story