दरम्यान, धोनीने आतापर्यंत 246 आयपीएल सामने खेळले असून 5074 धावा केल्या आहेत. तसंच 137 कॅच आणि 47 स्टम्पिंग केल्या आहेत.
धोनीने सध्याच्या आयपीएलमध्ये 12 सामन्यात 96 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 204.26 असून 48 ची सरासरी आहे.
"मी संघातील सहकाऱ्यांनाही हेच मी करणं अपेक्षित असल्याचं सांगितलं आहे. मला जास्त धावायला लावू नका. आणि याचा फायदा होत आहे. विजयात माझा वाटा आहे याचा आनंद आहे"
सामना संपल्यानंतर यासंबंधी विचारलं असता धोनीने आपल्या बॅटिंग आणि बॅटिंग पोझिशनसंबंधी काही सूचक विधानं केली आहेत.
धोनीला काही चेंडू खेळण्यास मिळालेले असतानाही त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
चेन्नईचा हा दिल्लीविरोधात सलग तिसरा पराभव आहे. 2011 पासून चेन्नईने आतापर्यंत सात वेळा चेपॉकमध्ये दिल्लीचा पराभव केला आहे.
IPL 2023: आयपीएलच्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात धोनी ब्रिग्रेडने डेव्हिड वॉर्नर अँड कंपनीला 27 धावांनी मात दिली.