नोबेल मेडलबरोबर मिळते आयुष्यभर पुरेल इतकी रक्कम; आकडा पाहून थक्क व्हाल

अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. पूर्वी हा पुरस्कार 5 विभागांमध्ये दिला जायचा. आता तो 6 विभागांमध्ये दिला जातो.

का दिला जातो हा पुरस्कार?

स्वीडिश वैज्ञानिक अलफ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. वेगवेगळ्या क्षेत्रात मानवतेच्या दृष्टीकोनातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल यांच्या स्मृतीप्रत्यार्थ हा पुरस्कार दिला जातो.

पहिला पुरस्कार कधी देण्यात आला?

अलफ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी म्हणजेच 1901 साली पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

कधी प्रदान केला जातो हा पुरस्कार

दरवर्षी 10 डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार दिला जातो. सामान्यपणे या पुरस्कारांची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते.

1940 ते 1942 दरम्यान दिला नाही पुरस्कार

1940 ते 1942 पर्यंत दुसऱ्या महायुद्धामुळे हा पुरस्कार खंडित करण्यात आला होता.

वेगवेगळ्या लोकांकडे वेगवेगळे अधिकार

भौतिक शास्त्रचा पुरस्कार देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे आहे. साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमीकडे आहे.

शांततेसाठीच्या पुरस्कारासाठी विशेष तरतूद

रसायनशास्त्र अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे आहे. शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी नेमली आहे.

अर्थशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचे नोबेल कोण देतं?

अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे आहे. वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे आहे.

विजेत्यांना नेमकं काय मिळतं?

विजेत्यांना पदक, पदवी आणि रोख रक्कम असे परितोषिक दिले जाते.

किती बक्षीस मिळतं?

1 कोटी 10 लाख स्विडीश क्रोना इतकी रक्कम नोबेल विजेत्यांना दिली जाते.

भारतीय चलनानुसार रक्कम किती?

भारतीय चलनानुसार ही रक्कम 8 कोटी 26 लाख 53 हजार रुपयांहून अधिक होते.

VIEW ALL

Read Next Story