श्रीदेवा यांच्या 'त्या' 29 सर्जरी कोणत्या?

बॉलीवूडची चांदणी आज आपल्यामध्ये नाही. श्रीदेवी यांना जाऊन पाच वर्ष झाली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह चाहत्यांना धक्का बसला होता. श्रीदेवी यांचं निधन क्रॅश डाएटमुळे झाल्याचं त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी सांगितलं.

बोनी कपूर यांनी सांगितलं की सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवी अनेक वेळा उपाशी राहत होती. अनेक वेळा श्रीदेवी यांना ब्लॅकआऊटचीही समस्या झाली होती. कमी रक्तदाबामुळे त्यांना त्रास होतो, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

श्रीदेवी ही बॉलिवूडमधील पहिली लेडी सुपरस्टार होती. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. कायम चिरतरुण दिसण्यासाठी श्रीदेवी यांनी शस्त्रक्रिया केल्या.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, चिरतरुण दिसण्यासाठी श्रीदेवी यांनी तब्बल 29 सर्जरी केल्या होत्या. एका रिपोर्टनुसार मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती.

मीडिया रिपोर्टनुसार त्या शस्त्रक्रियेसाठी अनेकदा दक्षिण कॅरोलिना, अमेरिकेत जात होत्या. एका रिपोर्टनुसार अशाच एका शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या ओठांचा आकार खराब झाला होतो.

ओठ, नाक, कान आणि गालाशिवाय त्यांनी शरीराच्या इतर अवयवांवरही शस्त्रक्रिया केल्या होत्या.

धक्कादायक म्हणजे डॉक्टरांनी त्याना डाएट गोळ्या घेण्याचा सल्ला दिला होता. त्याशिवाय त्या अनेक अँटी एजिंग औषधंही घेत होत्या.

श्रीदेवी यांनी सिलिकॉन ब्रेस्ट करेक्शन, फेस लिफ्ट अप्स, बोटॉक्स आणि ऑक्ली पील, बॉडी टकिंग, लेसर स्किन सर्जरी केली होती. शिवाय पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठीही सर्जरी केली होती.

VIEW ALL

Read Next Story