अमेरिकेची स्पेस एजन्सी नासा दरवेळेस काहीतरी काही नवीन करत असते.
असाच कारनामा नासाने पुन्हा एकदा केला आहे.
नासा एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे.
यामध्ये ते सापाच्या आकाराचा रोबोट बनवून त्याला अंतराळात पाठवतील.
हे सापासारखे रोबोट शनी ग्रहाच्या चंद्रावर जातील.
शनी ग्रहाचे 83 चंद्र आहेत.
यातील एकाचे नाव एन्सेलेडेस आहे, जिथे जीवन आढळण्याची शक्यता आहे.
चंद्रावर याचा शोध घेण्यासाठी नासाकडून सापासारखे दिसणारे रोबोट पाठवण्यात येतील.
ही केवळ तांत्रिक बाब म्हणून की याच्यामागे दुसरे कोणते कारण आहे? हे स्पष्ट झाले नाही.
सापांचा संबंध इतर ग्रहांशी आहे असे वैज्ञानिकांनी वाटते, असे म्हटले जाते.