कोण म्हणतंय 'जवान' सुपरहिट? 800 कोटींच्या कमाई कमाईवर शंका

जवानच्या कमाईवर शंका

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने जगभरात कमाईचा 800 कोटींचा आकडा पार केला आहे.

बॉलिवूडचा 'बादशाह'

जवान सुपरहिट झाल्यानंतर चाहते शाहरुख खानच बॉलिवूडचा बादशाह असल्याचं सांगत आहेत. फिल इंडस्ट्रीही सध्या शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. यादरम्यान, काहीजण मात्र टीका करताना दिसत आहेत.

'जवान'च्या कमाईचा आकडा खोटा ?

काही नेटकरी 'जवान'च्या कमाईचा आकडा खोटा असल्याचं सांगत आहेत. जवानसाठी कॉर्पोरेट बुकिंग केल्याचा त्यांचा दावा आहे. कमाईचे आकडे खोटे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

शाहरुखच्या चाहत्यांचा संताप

हे आरोप ऐकून शाहरुखचे चाहते मात्र संतापले आहेत. टीव्ही अभिनेता आणि शाहरुखचा चाहता धीरज कपूरने जवान फ्लॉप असल्याच्या आरोपावर संताप व्यक्त केला आहे.

धीरज कपूरने फटकारलं

धीरज कपूरने टीकाकारांना फटकारलं आहे. जवानच्या कमाईचे आकडे खोटे आहेत सांगणाऱ्यांना धीरज धूपरने मूर्ख म्हटलं आहे.

धीरज धूपरचं ट्वीट

धीरज धूपरने सांगितलं आहे की, काही मूर्ख लोक शाहरुखकडून त्याचा स्टारडम काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रपटासाठी कॉर्पोरेट बुकिंग केल्याचं ते म्हणत आहेत.

बुकिंगसाठी कोण 500 कोटी खर्च करतं?

"तुम्ही कोणत्या कॉर्पोरेट बुकिंगबद्दल बोलत आहात? चित्रपटाचे तिकीट आणि बुकिंगसाठी कोण 500 कोटी खर्च करतं?"

'शाहरुख इंडस्ट्रीचा निर्विवाद राजा'

"त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देणंही कठीण पडतं. एक लक्षात ठेवा की, शाहरुख इंडस्ट्रीचा निर्विवाद राजा आहे. तुम्ही सर्वांनी त्याचा जयजयकार केला पाहिजे"

VIEW ALL

Read Next Story